MNS Against Toll Rise: देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडण्यास सुरुवात

सध्या अविनाश जाधव टोक नाक्यावर चालकांंना व्हिडिओ दाखवत वाहनं टोल न भरता पुढे घेऊन जाण्यास सांगत आहेत.

Toll | Image used for representational purpose only. | Image Courtesy: Wikimedia Commons

देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ दाखवत मनसैनिकांकडून वाहनं विनाटोल सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 7 क्लिप्स दाखवल्या. यापैकी एकामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी लहान खाजगी वाहनांना टोल नसल्याचं म्हटलं आहे. मग सध्या सुरू असलेली टोल वसुली कुठे जाते? असा सवाल त्यांनी विचारला आहे. दरम्यान येत्या 2 दिवसांत मुख्यमंत्र्यांशी भेटून राज ठाकरे यामधून मार्ग काढणार आहेत. तोपर्यंत वाहनं टोल न देता सोडली जातील आणि संघर्ष झाल्यास टोलनाके जाळले जातील असे ते म्हणाले आहेत. सध्या अविनाश जाधव टोक नाक्यावर चालकांंना व्हिडिओ दाखवत वाहनं टोल न भरता पुढे घेऊन जाण्यास सांगत आहेत. Raj Thackeray टोलनाक्याच्या प्रश्नावरून पुन्हा आक्रमक; ... तर टोलनाके जाळण्याचा दिला इशारा .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement