Yogesh Kadam Accident: आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात, मागून येणाऱ्या टँकरची बसली जोरदार धडक
त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे.
आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला मात्र किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरता दाखल केले आहे. आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. हेही वाचा 'जगातील उद्योजकांना राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी सहकार्य''- Minister Deepak Kesarkar
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)