MLA Santosh Bangar Viral Video: 'मत द्या नाहीतर दोन दिवस जेवण करु नका', आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असतात. कधी त्यांचे वर्तन तर कधी वक्तव्य. आता विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत.

Santosh Bangar

मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदार संतोष बांगर हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असतात. कधी त्यांचे वर्तन तर कधी वक्तव्य. आता विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्यामुळे आमदार संतोष बांगर चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर बोलताना संतोष बांगर विद्यार्थ्यांना सांगत आहेत की, ''मत कोणाला द्यायचे तर आमदार संतोष बांगर यांना. तुम्ही घरी आग्रह धरा. आईवडीलांना सांगा बांगर यांनाच मत द्या. नाहीत तुम्ही मुलींना दोन दिवस जेवण करायचे नाही''. बांगर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आमदार बांगर यांच्या या सल्ल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. आमदार रोहीत पवार यांनी बांगर यांचा व्हिडिओ एक्स हँडलवरुन शेअर करत जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ''यांना मतदान करण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दोन दिवस जेवायचं नाही म्हणजे हे काय महात्मा आहेत का? यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघात काय दिवे लावले? लहान मुलांचा राजकारणासाठी वापर करणं हा गुन्हा असून याबद्दल या आमदार महाशयांवर कारवाई झाली पाहिजे!''

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement