आमदार Rohit Pawar यांच्याकडून रोहित पाटील यांना शुभेच्छा, अजित पवार यांना खोचक टोला

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या घडामोडींनंतर रोहित पवार यांनी अजित पवार गटाला खोचक टोला लगावत शुभेच्छा दिल्या आहेत.

Rohit Pawar (Photo Credits: Facebook)

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या घडामोडींनंतर रोहित पवार यांनी अजित पवार गटाला खोचक टोला लगावत शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित पवार यांनी शुभेच्छा देताना ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आदरणीय पवार साहेबांना कधीही धोका न देणारे आणि सदोदित सामान्य माणसाचं प्रतिनिधीत्व करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान नेते स्व. आर. आर. (आबा) पाटील यांचा वारसा चालवणारे माझे मित्र रोहित पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!''

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement