MLA Rohit Pawar: बृजभूषण सिंह यांचा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार यांचा भाजपवर निशाणा
त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही टीका स्वपक्षियांकडूनच होताना दिसते आहे. खासदार बृजभूषण सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये महापूरामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका होताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही टीका स्वपक्षियांकडूनच होताना दिसते आहे. खासदार बृजभूषण सिंह यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याच व्हिडिओवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
खासदार बृजभूषण सिंह यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत आमदार रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर बळीराजाचं दिवाळं निघालंय. त्याचे अश्रू पुसण्यासाठी आता राज्य सरकारने तातडीने पुढं यावं. UP तही अशीच स्थिती असून त्याचं वर्णन खुद्द भाजप खासदार पैलवान बृजभूषणसिंह यांच्याच तोंडून ऐका'.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)