MLA Disqualification Case Verdict Live Streaming: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून आमदार अपात्रता निकाल वाचन इथे पहा थेट (Watch Video)
सर्वोच्च न्यायालयाने आमदार अपात्रतेचा निकाल घेण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घेण्याच्या सूचना केल्या होत्या.
शिवसेना पक्षामध्ये दीड वर्षामध्ये उभी फूट पडली आणि राज्याच्या सत्तेला एक मोठी कलाटणी मिळाली. या प्रकरणी ठाकरे विरूद्ध शिंदे वादात आज विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाचा निकाल देणार आहे. राहुल नार्वेकर यांनी हा निकाल 'बेंचमार्क निकाल' असेल असं म्हटलं आहे. त्यामुळे आमदार, राजकीय पक्ष आणि सामान्यांचेही याकडे डोळे लागले आहेत. दुपारी 4 च्या सुमारास हा निकाल वाचला जाणार आहे. या निकालाच्या लाईव्ह स्ट्रिमिंगची सोय विधिमंडळातून करण्यात आली आहे. MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालात 'मॅचफिक्सिंग' आधीच झालंय - संजय राऊत .
पहा विधानसभा अध्याक्षांचा निकाल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)