Mira Road Communal Clash: 'धार्मिक दंगलींमुळे प्रगतीशील महाराष्ट्राची शांतता बिघडता कामा नये'; नयानगर घटनेवर Sharmila Thackeray यांची प्रतिक्रिया (Video)

पुढे परिस्थिती चिघळत गेली आणि या घटनेला हिंसक वळण लागले.

शर्मिला ठाकरे

अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणेवेळी मीरा रोडच्या नयानगर परिसरात मोठा हिंसाचार उफाळला होता. रविवारी रात्री नयानगर परिसरात तीन कार आणि अनेक दुचाकींवरुन रॅली काढली होती. यावेळी प्रभू श्रीरामांबद्दल घोषणाबाजी केली गेली. त्यामुळे काही स्थानिक लोकांनी रॅली काढणाऱ्या लोकांना मारहाण केली. पुढे परिस्थिती चिघळत गेली आणि या घटनेला हिंसक वळण लागले. अज्ञात व्यक्तींनी दुकानांना लक्ष्य करून तोडफोड केली. आता या सर्व घटनाक्रमावर शर्मिला ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या. ‘मी सर्व पत्रकारांना विनंती करते की माध्यमांनी हा विषय बंद करावा. अशा लहान-सहन गोष्टी घडत असतात, त्यांना तितके महत्व देऊ नका. सर्व जातींमध्ये सलोखा कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा. धार्मिक दंगलींमुळे प्रगतीशील महाराष्ट्राची शांतता बिघडता कामा नये, ते आपल्या राज्याच्या हिताचे नाही.’

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)