मंत्री जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम, नियमित तपासणीसाठी रुग्णालयात; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते.

Jayant Patil | (Photo Credits: twitter)

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. मात्र आता, 'आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सुचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. धन्यवाद!, ' असे जयंत पवार यांनी ट्वीट करत सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement