Milind Deora Quits Congress: मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा; 'शिवसेना' पक्षात आज करणार प्रवेश?
मिलिंद देवरा यांनी आज 55 वर्षांपासूनचे कॉंग्रेस सोबतचे संबंध तोडून आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
मिलिंद देवरा यांनी आज कॉंग्रेस पक्षामधून आपल्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. मागील 55 वर्ष त्यांचा कॉंग्रेस सोबत घनिष्ठ संबंध होता. घरात राजकीय पार्श्वभूमी देखील होती मात्र आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र ही जागा महाविकास आघाडी मध्ये उद्धव ठाकरे गटाने अरविंद सावंत यांच्यासाठी राखून ठेवली असल्याने नाराज मिलिंद देवरा आज शिंदे गटात म्हणजेच शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिलिंद देवरा यांचा राजीनामा महाराष्ट्र कॉंग्रेस साठी मोठा धक्का आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)