Mercedes Benz to Invest 3,000 Cr in Maharashtra: मर्सिडिझ बेंझ महाराष्ट्रात करणार 3000 कोटींची गुंतवणूक; उद्योगधंद्यांसह रोजगारात होणार वाढ

यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे.

Mercedes Benz to Invest 3,000 Cr in Maharashtra

Mercedes Benz to Invest 3,000 Cr in Maharashtra: जर्मन कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझ महाराष्ट्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सामंत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, ‘आज जर्मनी दौऱ्यावर असताना मर्सिडिझ बेंझ कंपनीच्या प्रतिनिधीसोबत बैठक झाली. मर्सिडिझ बेंझ ही कंपनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये 3000 कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांसह रोजगारात मोठ्या संख्येने वाढ होणार आहे. यासंदर्भात आज चर्चा झाली. यावेळी मर्सिडीज कंपनीचे मर्सिडीज-बेंझ ग्रुप ऑफ मॅनेजमेंट बोर्डाचे सदस्य डॉ. जोर्ग बर्झर,  पॉलिटिकल ऑपरेशन्स - एक्सटर्नल अफेयर्स, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्रीमती मरिना क्रेट्स, विक्री आणि विपणन, प्रदेश ओव्हरसीज, मर्सिडीज-बेंझ ग्रुप एजी संचालक श्री. मार्टिन शुल्झ, मर्सिडीज-बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कार्यकारी संचालन प्रमुख श्री. व्यंकटेश कुलकर्णी आदी उपस्थितीत होते.’ (हेही वाचा: Freshers Job in IT Companies: अजूनही निवड झालेले 10,000 फ्रेशर्स नोकरीच्या प्रतीक्षेत; Infosys, Wipro, TCS पुढे ढकलत आहेत ऑनबोर्डिंग- Reports)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)