MCA चे अध्यक्ष Rohit Pawar उतरले क्रिकेटच्या मैदानात, जबरदस्त फटकेबाजी करत विरोधकांना उत्तर देण्याचा केला प्रयत्न (Watch Video)

आमदार रोहित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केएसडी शानबाग विद्यालयाला भेट दिली.

Rohit Pawar (Photo Credit - Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी (MCA) नुकतीच निवड झाली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केएसडी शानबाग विद्यालयाला भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी विद्यालयातील मुलांचा सत्कार केला. तसेच सत्कारानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला. या आग्रहामुळे रोहित पवारांनी आपली बॅटींग किती भारी आहे हे दाखवुन दिलं. प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारत त्यांनी एक प्रकारे विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now