Maharashtra Weather Update: पुढील 4-5 दिवसांत राज्याच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमान 2-3 अंश सेल्सिअसने वाढणार; हवामान विभागाची माहिती
26-27 मार्च 2024 या कालावधीत कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणामध्ये अनेक बदल होत आहेत. राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे, तर काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार आहे. 26-27 मार्च 2024 या कालावधीत कोकणातील काही भागांमध्ये उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. यासंदर्भात हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तथापी, गेल्या दोन दिवसापासून मुंबई शहरातील तापमान 39 अंशांवर गेल्याने मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
अहमदनगर येथे 14.3 अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)