Maratha Reservation in Parliament: 'केंद्राने संविधानिक दुरुस्तीचे विधेयक आणून आरक्षणाची मर्यादा वाढवावी'; शिवसेना खासदार Om Rajenimbalkar यांनी संसदेमध्ये उठवला मराठा आरक्षणाचा मुद्दा

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज मराठा आरक्षणाचा आवाज संसदेत उठवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे.

खासदार ओमराजे निबांळकर (Photo Credits-Facebook)

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली व त्यामुळे राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालणे भाग पडले. आता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज मराठा आरक्षणाचा आवाज संसदेत उठवला. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. या वेळी निंबाळकर म्हणाले, ‘मराठा समाज आणि धनगर समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून 100 हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळाली आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा पुढे गेल्याने सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नव्हते. गेले अनेक दिवस आम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी करत आहोत. राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळे मराठा आणि धनगर समाजामध्ये असंतोष आहे. त्यामुळे आता तरी केंद्राने संविधानिक दुरुस्तीचे विधेयक आणून आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी आमची विनंती आहे.’ (हेही वाचा: Uddhav Thackeray On Farmers Loan Waiver: कर्जमाफी करुन राज्यातील बळीराजाला दिलासा द्या, उद्धव ठाकरे यांची मागणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now