Mangesh Satamkar Joins Shiv Sena: मंगेश सातमकर यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मंगेश सातमकर 1994 पासून नगरसेवक आहेत. जुने शिवसैनिक ओळख असलेले मंगेश सातमकर यांनी बीएमसीमध्ये शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद सांभाळले आहे.

Mangesh Satamkar | Twitter

आमदार, खासदार यांच्यानंतर आता माजी नगरसेवकांचा देखील ठाकरे गटातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू झाले आहे. सायन-कोळीवाडा भागातील माजी नगरसेवक आणि  जिल्हा नियोजन समिती सदस्य, एमएमआरडीए समिती सदस्य, शिक्षण समितीचे तीन वेळा सभापतीपद भूषवलेले मंगेश सातमकर देखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळेस आमदार प्रसाद लाड देखील शिंदेंसोबत उपस्थित होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now