Jagdeep Dhankhar Mimicry Row: मुंबई मध्ये भाजपा नेते, मंत्री Mangal Prabhat Lodha यांनी उपराष्ट्रपतींच्या नक्कल प्रकरणी MP Rahul Gandhi, Kalyan Banerjee विरोधात तक्रार दाखल

मंगलप्रभात लोढांनी MP Rahul Gandhi आणि TMC MP Kalyan Banerjee यांच्या विरूद्ध FIR नोंदवण्याची देखील मागणी केली आहे.

Lodha | Facebook

दिल्लीत संसदेच्या पायर्‍यांवर TMC MP Kalyan Banerjee यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानंतर यावरून सध्या विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांविरूद्ध उभे ठाकले आहे. आता या प्रकरणी भाजपा नेते, कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरावर आक्षेप घेत तक्रार दाखल करण्यास सुरूवात केली आहे. मुंबई मध्येही मंत्री मंगलप्रभात लोढांनी नक्कल करणार्‍या कल्याण बॅनर्जी आणि त्यांची नक्कल मोबाईल मध्ये टिपणार्‍या खासदार राहुल गांधी यांच्या विरूद्ध तक्रार नोंदवली आहे. काळाचौकी पोलिस स्टेशन मध्ये त्यांनी ही तक्रार नोंदवली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now