Man Pees in Pant in Bryan Adams’ Concert: गायक ब्रायन ॲडम्सच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये मधुमेही व्यक्तीने पँटमध्ये केली लघवी; Deepinder Goyal सह आयोजकांना खराब व्यवस्थापनाबद्दल फटकारले

याच कार्यक्रमाला गेलेल्या शेल्डन अरान्झोने LinkedIn वर एक पोस्ट करत, कार्यक्रमादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत.

Deepinder Goyal, Sheldon Aranjo (Photo Credits: Meta)

Man Pees in Pant in Bryan Adams’ Concert: नुकतेच मुंबईत कॅनेडियन गायक ब्रायन ॲडम्सचा कॉन्सर्ट पार पडला. 'झोमॅटो लाईव्ह' नावाच्या या कॉन्सर्टला हजारोंचा जनसमुदाय पोहोचला होता. यावेळी कार्यक्रमात शौचालयाची सुविधा नसल्यामुळे, कॉन्सर्टमध्ये गेलेल्या शेल्डन अरांगो नावाच्या व्यक्तीला त्याच्या पॅन्टमध्ये लघवी करण्यास भाग पाडण्यात आले. आता शेल्डन अरान्झोने आयोजकांना खराब व्यवस्थापनाबद्दल फटकारले आहे. कॉन्सर्ट आयोजकांनी तेथे येणाऱ्या लोकांच्या मूलभूत सुविधांची काळजी घेतली नसल्याचा आरोप केला आहे. शेल्डन सांगतात की, कॉन्सर्टमधील टॉयलेटची व्यवस्था तिथे पोहोचलेल्या गर्दीनुसार खूपच कमी होती. त्यांनी पुढे सांगितले की, ते मधुमेहाचे रुग्ण आहेत आणि शौचालय नसल्यामुळे त्यांना पॅन्टमध्ये लघवी करावी लागली. शेल्डन यांनी याबाबत सोशल मिडियावर एक पोस्ट लिहिली असून, त्यामध्ये त्यांनी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांना टॅग केले आहे.

माहितीनुसार, 13 डिसेंबर रोजी झोमॅटो आणि ईव्हीए ग्लोबल इव्हेंट्सने मुंबईत या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमाला गेलेल्या शेल्डन अरान्झोने LinkedIn वर एक पोस्ट करत, कार्यक्रमादरम्यानचे अनुभव शेअर केले आहेत. अरान्झोनुसार, एक हजाराहून अधिक लोक मैफिलीच्या ठिकाणी पोहोचले होते. एवढ्या मोठ्या जनसमुदायासाठी केवळ 3 स्वच्छतागृहे उपलब्ध होती. शौचालय न मिळाल्याने त्यांना अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यांनी त्यांच्या ओल्या पँटचा फोटोही शेअर केला आहे. (हेही वाचा: Cigarette In Biryani: हैदराबादच्या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना बिर्याणीमध्ये सापडली सिगारेट, व्हिडीओ व्हायरल)

ब्रायन ॲडम्सच्या मुंबई कॉन्सर्टमध्ये मधुमेही व्यक्तीने पँटमध्ये केली लघवी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या