Maharashtra Weather Update: अकोल्यात पारा 42.8 अंशांवर; पुढील दोन दिवसांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार
राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातही तापमानवाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमान 35 अंशांच्यावर पोहोचलं आहे.
Maharashtra Weather News : बुधवारी अकोल्यामध्ये (Akola ) राज्यातील नव्हे, देशातील सर्वाधिक तापमानाची (Highest Temprature) नोंद करण्यात आली. तापमानाचा पारा 42.8 अंशांवर पोहोचला होता. हे तापमान पुढे दोन दिवस असचं कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुण्यात (Pune Temprature) तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. धुळ्यात 39.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जळगावात तापमान 40.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोल्हापूरमध्ये 38.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar Temprature) 33.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. नाशिकमध्ये 38.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. निफाडमध्ये तापमान 37.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सातारामध्ये तापमान 38.9 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. रत्नागिरीत 32.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. छत्रपती संभाजी नगरात तापमान 39.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. नागपूरात 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. (हेही वाचा :Weather Update: उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; राज्यात तापमान ४० अंशांपार जाण्याची शक्यता )