Maharashtra Weather Forecast: कोकण ते विदर्भ पहा महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवसांसाठी IMD ने दिलेला हवामान अंदाज

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain | representative pic- (photo credit -pixabay)

महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस राज्यात संमिश्र स्वरूपाचा पाऊस बरसेल असा अंदाज आयएमडी कडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भ भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये 13 जुलै नंतर सुधारणा होईल असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. यंदा पावसाने उशिरा एंट्री घेतल्याने पिण्याच्या पाण्याच्या सार्‍याच साठ्यात दमदार पावसाची प्रतिक्षा राज्यातील नागरिकांना, शेतकर्‍यांना आहे.  वाचा: Chandigarh Heavy Mansoon: पुढील तीन तास मुसळधार पावसाची शक्यता, चंदीगड सोबत या भागात देखील अतिवृष्टी होणार, IMD ने दिला इशारा.

पहा हवामान खात्याचा अंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement