Maharashtra Weather Forecast: राज्यात पुढील 3 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाची शक्यता; जाणून घ्या जिल्हानिहाय हवामान अंदाज
महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने रेड ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या या आठवड्यात राज्यात पावसाचा कहर कायम राहणार आहे.
अनेक राज्यांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यामुळे, भारतीय हवामान खात्याने 5 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत महाराष्ट्र, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये एकाकी मुसळधार पावसासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या काळात महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मुसळधार पावसासाठी हवामान खात्याने रेड ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या या आठवड्यात राज्यात पावसाचा कहर कायम राहणार आहे. वादळाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करताना लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील 3 दिवसात कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाची दाट शक्यता आहे. (हेही वाचा: Mumbai Water Storage: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मध्य वैतरणा तलाव 90 टक्के भरला)
पहा तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)