Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुणे, सातारासह अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या पुढील काही दिवसांसाठी तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज
उद्या महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast: देशातील काही राज्यांना पावसाने दिलासा दिला असला तरी, महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढत असल्याचे दिसत आहे. कालपासून मुंबई उपनगरासह महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशात हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उद्या महाराष्ट्रातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर धुळे, दुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपुर, वर्धा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ व हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यात पुढील चारही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर अशा तीन जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पहा तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी.
पहा पोस्ट-