Maharashtra Weather Forecast: कोकण व मध्य महाराष्ट्रात सक्रिय मान्सूनची स्थिती कायम; येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा, जाणून घ्या जिल्हानिहाय अंदाज
हवामान खात्याचे म्हणणे आहे की बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्यामुळे एकूण 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशात काही दिवसांपासून कमकुवत झालेला मान्सून पुढील चार दिवस खूप तीव्र असणार आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले असून त्यामुळे एकूण 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेलंगणा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक किनारपट्टीच्या विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अशात भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात पुढील 2-3 दिवसांमध्ये सक्रिय मान्सूनची स्थिती कायम राहील. येत्या 5 दिवसांत तीव्र हवामानाचा इशारा देण्यात आला आहे. (हेही वाचा: Mumbai Rains: मुंबईच्या एसी डबल डेकर बस वर पहिल्याच पावसाळ्यात कोसळलं झाड; सुदैवाने जीवित, वित्तहानी नाही)
पहा तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणी-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)