Maharashtra Vidhan Sabha Election 2024: चंद्रशेखर बावनकुळे यांना विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या घराबाहेर सेलिब्रेशनला सुरूवात (Watch Video)
2019 मध्ये विधानसभेचं तिकिट डावललेल्या चंद्रशेखर बावनकुळेंना आता पुन्हा कामेठी मधून तिकीट जाहीर करण्यात आलं आहे.
आज भाजपा ने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत विधानसभा निवडणूकींसाठी रणशिंग फुंकले आहे. या यादीमध्ये सध्या भाजपा प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. दरम्यान मागील निवडणूकीत त्यांना पक्षाकडून डावलण्यात आले होते. त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती आता ते विधानपरिषदेमधून आमदार आहेत, पण तरीही आता 2024 च्या विधानसभा निवडणूकीमध्ये पुन्हा त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांना कामठी मधून तिकीट देण्यात आले आहे. BJP Candidate List For Maharashtra Assembly Polls: भाजपा ची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंना उमेदवारी.
चंद्रशेखर बानवकुळे यांना कामठी मधून विधानसभेचं तिकिट
बावनकुळेंची प्रतिक्रिया
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)