Maharashtra Vidhan Parishad Election 2024: उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी; दाखल केला अर्ज

महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास ५ ते ६ मतांची गरज असणार आहे.

Uddhav Thackeray, Milind Narvekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर यांना विधान परिषदेमध्ये आमदारकीची  उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानपरिषदेसाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणूकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. आज त्यांना उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म देण्यात आल्यानंतर त्यांनी  उमेदवारीचा अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज भरताना स्वत: उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील, प्रज्ञा सातव, सुद्धा उपस्थित होत्या. दरम्यान महाविकास आघाडीचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यास ५ ते ६ मतांची गरज असणार आहे. त्यामुळे आता नार्वेकर कसे निवडून येणार याकडे लक्ष लागले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by युवासेना YuvaSena (@yuvasenaforyou)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now