Maharashtra Udyog Ratna Award: महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती Ratan Tata यांना जाहीर
हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर अपेक्षित आहे. या योजनेत होतकरू महिला आणि तरुण उद्योजकांसाठीही पुरस्कार असतील, असेही सामंत म्हणाले.
रतम टाटा यांना पहिल्या महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. महाराष्ट्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांवर चर्चा करताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषदेत या पुरस्काराबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘उद्योगपतींनी समाजासाठी केलेल्या अनुकरणीय सेवेचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने ‘उद्योगरत्न’ पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पुरस्कार 'महाराष्ट्र उद्योगरत्न' म्हणून ओळखला जाईल आणि टाटा समूहाचे रतन टाटा यांना पहिल्या पुरस्काराने सन्मानित केले जाईल.’
हा पुरस्कार राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या धर्तीवर अपेक्षित आहे. या योजनेत होतकरू महिला आणि तरुण उद्योजकांसाठीही पुरस्कार असतील, असेही सामंत म्हणाले. (हेही वाचा: ABHA Health Card: राज्यातील सर्व नागरिकांसाठी 'आभा' हेल्थ कार्ड आवश्यक; जाणून घ्या फायदे व कुठे काढाल)