MSRTC ची मोठी घोषणा; अटल सेतू वरून धावणार मुंबई-पुणे-मुंबई नियमित दोन प्रिमियम शिवनेरी

अटल सेतू वरून चालवल्या जाणार्‍या बस च्या तिकीटामध्येही कोणता बदल केला जाणार नाही.

Shivneri bus| Twitter

शिवडी ते न्हावा शेवा ला जोडणारा अटल सेतू मुंबईकरांना 20 मिनिटांत नवी मुंबई मध्ये घेऊन  जात आहे. यामुळे इंधनाची आणि प्रवासाचा वेळ वाचला आहे. आता या मार्गावरूनच मुंबई-पुणे-मुंबई शिवनेरी बस चालवली जाणार असून यामुळे मुंबई-पुणे प्रवास करणार्‍यांचाही प्रवास सुस्साट होणार आहे. MSRTC ने दिलेल्या माहितीनुसार, सध्या प्रायोगिक तत्त्वावर नियमित 2 बस चालवल्या जाणार आहेत. दरम्यान याबससेवेसाठी शिवनेरीच्या तिकीटामध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 20 फेब्रुवारीपासून पुणे स्टेशन -मंत्रालय(सकाळी ६.३०) व स्वारगेट- दादर (७.००) या दोन मार्गावर शिवनेरी बस सुरू करण्यात येत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now