कोरोना काळात IPC 188 अंतर्गत विद्यार्थी, नागरिकांवर टाकलेले गुन्हे महाराष्ट्र गृह विभाग मागे घेणार

कोरोना संकटात कोविड 19 नियमावलीचं पालन न करणार्‍यांवर कारवाई करताना अनेकांवर कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

Dilip Walse Patil | PC: Twitter/ANI

कोरोना काळात  IPC 188 अंतर्गत विद्यार्थी, नागरिकांवर टाकलेले गुन्हे महाराष्ट्र गृह विभाग मागे घेणार  असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यांमुळे अनेकांची परदेशवारी साठी व्हिसा मिळवण्यात अडथळा निर्माण झाला आहे. आता कॅबिनेट मध्ये याचा निर्णय घेतल्यानंतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)