Maharashtra Rains: अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत (Watch Video)
अकोल्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. याआधी अकोला जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी झालेला पाऊस आणि वादळाने मोठे नुकसान केले होते.
Maharashtra Rains: महाराष्ट्रातील काही भागांमध्ये आज मान्सूनचे आगमन झाले. येत्या 10 जूनपर्यंत विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल. राज्यातील काही भागात आज मान्सून पूर्व सारी कोसळल्या. यामध्ये अकोल्यात अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. याआधी अकोला जिल्ह्यात मंगळवारी व बुधवारी झालेला पाऊस आणि वादळाने मोठे नुकसान केले होते. आता माहितीप्रमाणे 5 ते 8 जून दरम्यान राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानुसार, दक्षिण कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस, जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसंबंधीची संपूर्ण महिती, जाणून घ्या)
पहा पोस्ट-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)