Maharashtra Rain Alert: पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज
पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तेथील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
Maharashtra Rain Alert: पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department Forecast)दिला आहे. त्याशिवाय, कोकणात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे(Pune) आणि सातारा(Satara) जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. कोयना धरणक्षेत्रात तसेच पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. सकाळी खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहून कामकाज करणे सोयीटे ठरेल. (Sindhudurg Rain Update: सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत)
पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)