Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेना नेते Aaditya Thackeray यांनी 'मातोश्री'वर पोहोचल्यावर दिले विजयाचे संकेत (Watch Video)

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पोहोचल्यावर हात उंचावून जनतेला अभिवादन केले

Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'वर्षा' सोडले. ते आपल्या कुटुंबासह खाजगी निवासस्थान मातोश्रीवर रहायला गेले आहेत. ठाकरे शासकीय निवासस्थानातून बाहेर पडत असताना नीलम गोर्‍हे, चंद्रकांत खैरे आदी शिवसेना नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य व तेजस ठाकरे उपस्थित होते. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर पोहोचल्यावर हात उंचावून जनतेला अभिवादन केले. यावेळी त्यांनी बोटाने विजयाचेही चिन्ह दाखवले. यावरून त्यांनी विजयाचे संकेत दिले असल्याचे बोलले जात आहे. सध्या या गोष्टीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)