Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित मंत्री, आमदार अजित पवारांसह शरद पवार यांच्या भेटीला; Praful Patel देखील उपस्थित
अजित पवार यांच्यासह 9 एनसीपी मंत्र्यांनी भाजपा सह सत्तेमध्ये सहभाग घेतला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी एनसीपी मध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट असे विभाजन झाल्यानंतर अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यात आली आणि खळबळ उडाली. त्यानंतर आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी अजित पवार यांच्यासह नवनिर्वाचित मंत्री, आमदार मुंबई मध्ये शरद पवार यांच्या भेटीला गेले आहेत. वायबी चव्हाण सेंटर मध्ये ही भेट होत असून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांना देखील तातडीने वायबी चव्हाण सेंटर मध्ये बोलावून घेतले आहे. अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याचा आकडा स्पष्ट झालेला नाही.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)