Maharashtra Monsoon Session 2024: राज्याचे पावसाळी अधिवेशन 27 जूनपर्यंत पुढे ढकलले; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, (विधानसभा) अधिवेशनासाठी 10 जूनची तारीख 27 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे.

CM Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Maharashtra Monsoon Session 2024: महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सांगितले, ‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, (विधानसभा) अधिवेशनासाठी 10 जूनची तारीख 27 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. मंत्रिमंडळाची शिफारस राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीस अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तेव्हा 10 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता केंद्रीय अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनानंतर हे अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (हेही वाचा: Maharashtra Rains: अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now