Maharashtra Legislature's Budget Session 2023: 'जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 ची सुरुवात (Watch Video)

महाराष्ट्र शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले.

महाराष्ट्र विधिमंडळ (संग्रहित संपादित प्रतिमा)

आजपासून महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरु झाले. याआधी विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना आणि काँग्रेस यांनी रविवारी सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि कायदेशीर लढाईचे पडसाद सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2023 ची सुरुवात 'जय जय महाराष्ट्र माझा…गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताने झाली. महाराष्ट्र शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारले. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement