Maharashtra Karnataka Border Dispute: सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीच्या नेत्यांनी घेतली अमति शाहा यांची भेट, सीमाप्रश्नांवर चर्चा
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी ही भेट घेण्यात आली असून, चर्चा सुरु आहे. दरम्यान, कर्नाटक सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार सीमाभागातील मराठी जनांवर अन्यायकारक वागणूक दिली जाते. त्यासोबतच कर्नाटकच्य मुख्यमंत्र्यांकडूनही अत्यंत वादग्रस्त विधाने केली जात असल्याच्या पर्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघीच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी ही भेट घेण्यात आली असून, चर्चा सुरु आहे. दरम्यान, कर्नाटक सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार सीमाभागातील मराठी जनांवर अन्यायकारक वागणूक दिली जाते. त्यासोबतच कर्नाटकच्य मुख्यमंत्र्यांकडूनही अत्यंत वादग्रस्त विधाने केली जात असल्याच्या पर्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
ट्विट