Maharashtra Heatwave Advisory: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील उष्माघात प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

कार्यक्रमाला उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 13 श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं.

Heat Wave प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

Maharashtra Heatwave Advisory: ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारकडून नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 13 श्रीसदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. या घटनेनंतर राज्य सरकारने भरदुपारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे दुपारच्या वेळी खुल्या जागेत कोणतेही कार्यक्रम घेतले जाऊ नयेत, असे निर्देश राज्य सरकारने काढले आहेत. जोपर्यंत राज्यात उन्हाची स्थिती आहे, तोपर्यंत दुपारी 12 ते 5 वाजेच्या दरम्यान खुल्या भागात, मैदानात कोणताही कार्यक्रम न घेण्याचा निर्देश देण्यात आले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement