Ratan Tata यांना 'Bharat Ratna' देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत संमत
आज वरळी येथील स्मशानभूमीमध्ये रतन टाटांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
रतन टाटा यांचं 86 व्या वर्षी निधन झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दरम्यान रतन टाटांच्या सन्मानार्थ आज आदरांजली अर्पण करत महाराष्ट्र सरकारने एक दिवसाचा दुखवटा पाळला आहे पण त्यासोबतच आता रतन टाटांना 'भारतरत्न' देण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मांडला आहे. या पुरस्काराचा प्रस्ताव आता केंद्र सरकार कडे विनंती केली जाणार आहे. आज मुख्यमंत्री यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शोक प्रस्ताव मांडला होता. Condolence Messages for Ratan Tata Go Viral: रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघा भारत हळहळला; सामान्य नेटकर्यांकडून प्रेरणादायी Quotes शेअर करत श्रद्धांजली अर्पण.
रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळणार?
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)