Maharashtra Cabinet ची बैठक 2.30 ऐवजी आता संध्याकाळी 5 वाजता

आमदारांच्या बंडखोरीनंतरची ही दुसरी कॅबिनेट बैठक आहे.

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 2.30 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती ती आता संध्याकाळी 5 वाजता घेण्यात येणार आहे. कालच बंडखोर मंत्र्यांकडील खाती काढून सध्या महाविकास आघाडी सोबत असलेल्यांकडे त्याचा कारभार सोपावण्यात आला आहे. मुख्यमंत्री या बैठकीला व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत तर उपमुख्यमंत्री कोरोनाची लागण झाल्याने व्हिसी द्वारा सहभागी होणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)