Maharashtra Cabinet Expansion 2024: नितेश राणे यांना संधी, भाजपच्या नव्या चेहऱ्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
तरुण आमदरांना मंत्रिपदाची शपथ देऊन भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे जुने लोक नाराज होण्याची शक्यता असली तरी, भाजप आगामी काळात हा संघर्ष कसा मिटवतो याबाबत उत्सुकता आहे.
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज (15 डिसेंबर) पार पडला. या अधिवेशनात भाजपच्या एकूण बारा मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये काही जुन्या तर काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. नव्या चेहऱ्यांमध्ये संधी मिळालेल्यांमध्ये शिवेंद्र राजे भोसले, नितेश राणे यांसारख्या चेहऱ्यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांना महत्त्वाची संधी दिल्याे भाजपने तरुणांना वाव दिल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, त्यामुळे काही जुने जाणते लोक नाराज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर भाजप कसा मार्ग काढतो याबाबत उत्सुकता आहे. मंत्रिपदाची पहिल्यांदाच शपथ घेतलेले भाजपचे नवे चेहरे खालील प्रमाणे:
शिवेंद्रराजे भोसले शपथ घेताना
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)