Maharashtra Assembly Elections: माहीम येथे MNS ला कडवे आव्हान; Sada Sarvankar यांचा निवडणुकीच्या मैदानातून मागे न हटण्याचा निर्णय

सदा सरवणकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते पण ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली. त्यानंतर सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली.

Sada Sarvankar | (Photo Credits: Facebook)

Maharashtra Assembly Elections: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत होती, जी आता संपली आहे. अशात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नाही. सदा सरवणकर मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते पण ठाकरे यांनी सरवणकर यांना भेट नाकारली. त्यानंतर सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली.

याबाबत माहीम विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर म्हणतात, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्यानंतर, या जागेसाठी योग्य उमेदवाराचा सल्ला देण्यासाठी मी राज ठाकरेंना भेटायला गेलो. मला राज ठाकरेंचा निर्णय मान्य करण्यास सांगण्यात आले होते. मात्र काही वेळ वाट पाहिल्यानंतरही ते मला भेटायला तयार झाले नाहीत. मला राज ठाकरेंचा आदर आहे आणि मी त्यांना बाळासाहेब ठाकरेंचेच प्रतिबिंब मानतो. मात्र आता मी महायुतीचा उमेदवार म्हणून फॉर्म भरला असून, मी माहीमच्या जनतेसाठी काम करणार आहे.’ राज ठाकरेंनी भेटण्यास नकार दिल्यानंतर सरवणकर यांनीही निवडणुकीच्या मैदानातून मागे न हटण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेला माहीम येथे कडवे आव्हान असणार आहे. (हेही वाचा: Kolhapur North Assembly Constituency: कोल्हापूर उत्तर येथून सतेज पाटील यांना धक्का, काँग्रेसचा पंजा गायब; मधुरिमाराजे छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज मागे)

सदा सरवणकर यांचा निवडणुकीच्या मैदानातून मागे न हटण्याचा निर्णय-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now