Maharashtra Assembly Elections 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जारी केली 16 उमेदवारांची यादी

महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे.

Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

Maharashtra Assembly Elections 2024: आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने सोमवारी 16 उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील व्हीबीएनेही बारामतीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे उपमुख्यमंत्री अजित पवार विद्यमान आमदार आहेत आणि त्यांना पुन्हा तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. नव्या यादीत नवी मुंबई- ऐरोली आणि मुंबई उपनगरातील- जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, मालाड, अंधेरी पूर्व, घाटकोपर पश्चिम, घाटकोपर पूर्व आणि चेंबूर या सात जागांचा समावेश आहे. बारामतीतून व्हीबीएने मंगलदास निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे. अजित पवार यांनी बारामतीतून पुन्हा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना आणखी एक तगडा उमेदवार मिळेल. महाराष्ट्र विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा करणारा वंचित बहुजन आघाडी हा पहिला पक्ष होता. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीशी चर्चा निष्फळ ठरल्याने पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: मुंबईत 22 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद; विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार- Nana Patole)

वंचित बहुजन आघाडीने जारी केली 16 उमेदवारांची यादी-

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement