Maharashtra Assembly Elections 2024: बिटकॉइन घोटाळ्याचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा माजी आयपीएस अधिकारी Ravindranath Patil यांचा आरोप; Supriya Sule यांची निवडणूक आयोगाकडे धाव, फौजदारी तक्रार दाखल

सुप्रिया सुळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने पत्रात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी.

Supriya Sule | X

महाराष्ट्रात बुधवारी विधानसभा निवडणुका होत आहेत. याच्या एक दिवस आधी पुण्यातील एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला आहे. दोन्ही नेत्यांनी 2018 मध्ये बिटकॉइनचा गैरव्यवहार केल्याचा आरोप माजी आयपीएसने केला आणि सध्याच्या विधानसभा निवडणुकीत हा पैसा वापरला जात असल्याचे म्हटले आहे. या आरोपांविरोधात सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला तक्रार पत्र लिहिले आहे. सुप्रिया सुळे यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने पत्रात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात खोटी माहिती पसरवणाऱ्या पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता यांच्या विरोधात सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ दाखल करण्यात यावी. वकिलाने पत्रात लिहिले की, 'विधानसभा निवडणुकीत निधी वाटपाच्या उद्देशाने नाना पटोले आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून बिटकॉईनचा गैरवापर होत असल्याचा खोटा आरोप केला जात आहे. डिजिटल माध्यमांचा वापर करून फसवणूक आणि बदनामी करण्याच्या हेतूने केलेला हा गंभीर गुन्हा आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत. यासह सुप्रिया सुळे यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याचा दुर्भावनापूर्ण प्रयत्न केला जात आहे.’ (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections 2024: राज्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात, जाणून घ्या हेल्पलाइन क्रमांक, कशी मिळवावी मतदान केंद्राची माहिती, ग्राह्य असणारी ओळखपत्रे)

रवींद्रनाथ पाटीलविरोधात सुप्रिया सुळे यांनी दाखल केली तक्रार-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)