Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु; आतापर्यंत 304 कोटी 94 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Election Commission of India | File Image | (Photo Credits: PTI)

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ साठी  १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३१२८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३११२ तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाऊनलोड करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

राज्य व केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. (हेही वाचा: Maharashtra Assembly Elections: जाणून घ्या निवडणूक काळात राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी ‘काय करावे’आणि ‘काय करू नये’; नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिक C-Vigil App वर करू शकतात तक्रार)

आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)