Maharashtra Assembly Election Results 2024: आदित्य ठाकरेंनी राखला वरळीचा गड; अमित ठाकरे यांचा पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव

राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवू शकले नाहीत. अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत.

Aaditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. महायुतीच्या एकतर्फी विजयात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 58 जागा मिळत आहेत. त्यातही काँग्रेस 15, शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट 11 जागांवर विजयी होताना दिसत आहे. या निवडणुकीत अनेक 'युवराज'ही रिंगणात होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे ही मोठी नावे आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून, तर अमित ठाकरे मुंबईत माहीममधून निवडणूक लढवत होते. वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत तर माहीममधून अमित पराभूत झाले आहेत. वरळी जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलिंद मुरली देवरा यांना उमेदवारी दिली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पराभाआव केलां आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातून संदीप देशपांडे यांना येथून उमेदवारी दिली होती. देशपांड यांना 18858 मते मिळाली आहेत.

दुसरीकडे, राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवू शकले नाहीत. अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत. ते केवळ 1080 मतांनी विजयी झाले. याआधी सदा सरवणकर यांनी 2014 आणि 2019 मध्ये माहीम मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. (हेही वाचा: Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: अमोल खताळ ते स्नेहा पंडित दुबे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये जायंट किलर पहा कोण कोण ठरले)

आदित्य ठाकरे वरळी येथून विजयी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now