Maharashtra Assembly Election Results 2024: आदित्य ठाकरेंनी राखला वरळीचा गड; अमित ठाकरे यांचा पहिल्याच निवडणुकीत दारुण पराभव
राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवू शकले नाहीत. अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत.
Maharashtra Assembly Election Results 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक आहेत. महायुतीच्या एकतर्फी विजयात अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीला केवळ 58 जागा मिळत आहेत. त्यातही काँग्रेस 15, शिवसेना 27 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद गट 11 जागांवर विजयी होताना दिसत आहे. या निवडणुकीत अनेक 'युवराज'ही रिंगणात होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे ही मोठी नावे आहेत. आदित्य ठाकरे वरळीतून, तर अमित ठाकरे मुंबईत माहीममधून निवडणूक लढवत होते. वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले आहेत तर माहीममधून अमित पराभूत झाले आहेत. वरळी जागेवरून शिवसेनेच्या शिंदे गटाने मिलिंद मुरली देवरा यांना उमेदवारी दिली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पराभाआव केलां आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षातून संदीप देशपांडे यांना येथून उमेदवारी दिली होती. देशपांड यांना 18858 मते मिळाली आहेत.
दुसरीकडे, राज ठाकरे आपला मुलगा अमित ठाकरे यांना विधानसभेत पाठवू शकले नाहीत. अमित मुंबईच्या माहीममधून निवडणूक लढवत होते. भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला होता. आता माहीममधून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे महेश बळीराम सावंत विजयी झाले आहेत. ते केवळ 1080 मतांनी विजयी झाले. याआधी सदा सरवणकर यांनी 2014 आणि 2019 मध्ये माहीम मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. (हेही वाचा: Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024: अमोल खताळ ते स्नेहा पंडित दुबे पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये जायंट किलर पहा कोण कोण ठरले)
आदित्य ठाकरे वरळी येथून विजयी-
Aaditya Thackeray has uncle Raj to thank, Amit has uncle Uddhav to blame#AadityaThackeray #AmitThackeray #UddhavThackeray #RajThackeray #MaharashtraElection2024 #MaharashtraElectionResults https://t.co/QFl712Tp65
— IndiaToday (@IndiaToday) November 23, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

