Mahaparinirvan Diwas 2024 Traffic Advisory: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केले 5-7 डिसेंबरसाठी वाहतूक निर्बंध; दादरच्या आसपासच्या वाहनांच्या हालचालींवर होणार परिणाम, पहा तपशील

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमधील चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 ते 7 डिसेंबरसाठी हे वाहतूक निर्बंध असतील.

Mumbai Traffic | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mahaparinirvan Diwas 2024 Traffic Advisory: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या पुण्यतिथी, महापरिनिर्वाण दिनापूर्वी, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमधील चैत्यभूमीवर येणाऱ्या लोकांच्या मोठ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी 5 ते 7 डिसेंबरसाठी हे वाहतूक निर्बंध असतील. या दिवशी बाबासाहेबांचे हजारो अनुयायी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील अशी अपेक्षा असल्याने, वाहतूक निर्बंधामुळे दादर आणि आसपासच्या वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम होईल. सुरळीत वाहतूक प्रवाह आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी, अनेक रस्ते एकतर बंद केले जातील, किंवा एकमार्गी मार्गांमध्ये रूपांतरित केले जातील. (हेही वाचा: Mahaparinirvan Divas 2024 Suburban Special Trains: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 5 व 6 डिसेंबरच्या मध्यरात्री चालवणार 12 अतिरिक्त उपनगरीय विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक)

पहा वाहतूक निर्बंध-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now