Loudspeaker Controversy: पुणे पोलिसांनी बजावल्या मनसे शहर प्रमुख Sainath Babar यांच्यासह अनेक नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा

उद्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे

MNS | (Photo Credits: Twitter)

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मेपर्यंत मुदत दिली आहे. तसे न घडल्यास 4 मे पासून मशिदींसमोर दुप्पट मोठ्या आवाजात हनुमान चालिसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसे सैनिकांना दिले आहेत. उद्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणारी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अशात पुणे पोलिसांनी मनसे शहर प्रमुख साईनाथ बाबर यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांना राज्यातील लाऊडस्पीकर वादाच्या पार्श्वभुमीवर प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement