Lokshahi Channels License Suspended: लोकशाही मराठीचा परवाना 30 दिवसांसाठी निलंबित; I&B Ministryची कारवाई, प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश (Watch)

याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.

Television (Photo Credit : Pixabay)

I&B Ministry Cancels Lokshahi Channels License: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘लोकशाही मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीचा परवाना मंगळवारी 30 दिवसांसाठी निलंबित केला. मंत्रालयाने नोटीस देऊन लोकशाही मराठीचे मंगळवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून पुढील 30 दिवसांसाठी प्रक्षेपण बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी 14 जुलै 2023 रोजी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओचे वृत्त दिल्यानंतर ही वाहिनी सरकारी स्कॅनरखाली आल्याचा आरोप वृत्तवाहिनीने केला आहे.

वृत्तवाहिनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकशाही मराठीने आपले लोकशाही कर्तव्य पार पाडण्यात निर्भय पत्रकारितेचे प्रदर्शन करत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली 14 जुलै 2023 रोजी एका बातमीमुळे 72 तासांच्या शटडाऊनची सूचना देण्यात आली. यानंतर, आम्ही दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली व हे शटडाऊन यशस्वीरित्या उठवले. मात्र, मंत्रालयाने आता लोकशाही मराठीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबतही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे जिथे एखाद्या वाहिनीला ऑपरेशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.’ (हेही वाचा: Lokshahi Off Air For 72 Hours: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नोटिशीनंतर लोकशाही वृत्तवाहिनी 72 तासांसाठी निलंबित; भाजप नेते Kirit Somaiya यांचा व्हिडिओ प्रसारित करणे पडले महागात)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now