Lok Sabha Elections 2024: वंचित बहुजन आघाडी पक्षाने जाहीर केली 5 उमेदवारांची तिसरी यादी; बारामतीतून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी युती तोडून एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये जागावाटपावर एकमत झाले नाही. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. पक्षाने तिसऱ्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. वंचितने महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) उमेदवार आणि पक्षप्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तिसऱ्या यादीत वंचित बहुजन आघाडी पक्षाने पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे, शिरूरमधून मंगलदास बागुल, औरंगाबादमधून अफसर खान, परभणीतून बाबासाहेब भुजंगराव उगले आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून अविनाश बोसीकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी पक्षाने आतापर्यंत एकूण 24 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी युती तोडून एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमध्ये जागावाटपावर एकमत झाले नाही. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वतः अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. 19 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील निवडणुका होत आहेत. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. (हेही वाचा: Sanjay Nirupam on Sanjay Raut: काँग्रेस नेत्याकडून संजय राऊत यांच्या नावाने खडे फोड, शिवसाना, राष्ट्रवादी संपविल्याचा आरोप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now