Lok Sabha Elections 2024: अजित पवार गटाला मोठा धक्का; आमदार निलेश लंके शरद पवारांच्या भेटीला (Video)

अजित पवार गटातील पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील शरद पवार गटाच्या पुणे कार्यालयात दाखल झाले आहेत. आमदार निलेश लंके हे आज शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar | (File Image)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटातील पारनेरचे आमदार नीलेश लंके हेदेखील शरद पवार गटाच्या पुणे कार्यालयात दाखल झाले आहेत. आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार गटात  प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध सुजय विखे अशी लढत होणार असल्याची शक्यता वात्वली जात आहे. (हेही वाचा: Rahul Gandhi On Farmers At Nashik: इंडिया आघाडी 'शेतकऱ्यांचा आवाज'; नाशिकमधील चांदवड येथून राहुल गांधी यांची ग्वाही)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement