Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On Zee 24 Taas: कोणाच्या हातात येणार देशाच्या कारभाराची सूत्रे, NDA की INDIA आघाडी? झी 24 तास वर पहा लोकसभा निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)

जवळजवळ 80 दिवसांच्या प्रक्रियेनंतर 51 पक्षांच्या 8360 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. यावरून देशाचा राज्यकारभार कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होईल.

Lok Sabha Election 2024 Result

Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On Zee 24 Taas: देशातील लोकसभा निवडणूक 2024 प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. 1 जून रोजी मतदानाचे सर्व टप्पे पार पडल्यानंतर आता, आज 4 जून रोजी निकालाची प्रतीक्षा आहे. देशात सर्व ठिकाणी मतमोजणीपूर्वी तयारी पूर्ण झाली आहे. 80 दिवसांच्या प्रक्रियेनंतर 51 पक्षांच्या 8360 उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज होणार आहे. यावरून देशाचा राज्यकारभार कोणाच्या हाती येणार हे स्पष्ट होईल. एका बाजूला एनडीए आहे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्स आहे, मात्र एक्झिट पोलने पुन्हा एकदा मोदी सरकार परत येणार असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोग 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करणार आहे. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल आणि नंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी केली जाईल. मराठी वृत्तवाहिनी झी 24 तासवर (Zee 24 Taas) तुम्ही निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.

पहा झी 24 तासवर लोकसभा निवडणुकीचे निकाल-

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement