Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On News18 Lokmat: यंदा मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? न्यूज18 लोकमतवर पहा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे थेट प्रक्षेपण (Video)
एका बाजूला पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची नवी आघाडी 'इंडिया' आहे. 1 जून रोजीच्या एक्झिट पोलने चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही.
Lok Sabha Election 2024 Result Live Streaming On News18 Lokmat: सुमारे सहा आठवडे चाललेल्या लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या आणि सातव्या टप्प्यासाठी शनिवारी म्हणजेच 1 जून रोजी मतदान झाले. त्यानंतर आज, 4 जून रोजी 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. सुमारे 97 कोटी मतदारांनी 543 लोकसभा जागांसाठी लढणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य ठरवले आहे. त्यापैकी गुजरातमधील सुरत लोकसभा जागा वगळता 542 जागांवर आज निर्णय होणार आहे. मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने (ECI) रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती केली आहे, जो आज पारदर्शकतेने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय मतमोजणी करेल. देशात कोणाची सत्ता येणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. एका बाजूला पीएम मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांची नवी आघाडी 'इंडिया' आहे. 1 जून रोजीच्या एक्झिट पोलने चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही न्यूज18 लोकमतवर निवडणूक निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे लागेल-
या ठिकाणी पहा लोकसभा निवडणुकीचे निकाल-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)